बांगलादेश निर्मिती इंदिरा गांधींमुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:51+5:302021-09-23T04:12:51+5:30
पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे ...
पुणे : “बांगलादेशात पाकिस्तानचे अत्याचार सुरूच राहिले तर भविष्यात भारतामध्ये समस्या निर्माण होतील हे ओळखून इंदिरा गांधी यांनीच खंबीरपणे पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारले व जिंकलेही,” असे प्रतिपादन बांगलादेश लिब्रेशन वॉर समितीचे समन्वयक कॅप्टन प्रवीण डावर यांनी केले.
बांगलादेश निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी कॉंग्रेस भवनात आयोजित व्याख्यानात डावर बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कर्नल सुरेश पाटील, सुभेदार मेजर हिरालाल बोरसे, सुभेदार मेजर शिवणेकर, माजी सैनिक पी. एन. राव, पंढरीनाथ ताकवले, माजी नायक सुभेदार मधुकर पायगुडे, सुभेदार मेजर टी. एम. सूर्यवंशी, महिलाध्यक्ष सोनाली मारणे आदी यावेळी उपस्थित होते. विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर यांनी आभार मानले.