बांग्लादेशीय घुसखोर तालुक्यातही!
By Admin | Published: October 15, 2015 12:43 AM2015-10-15T00:43:17+5:302015-10-15T00:43:17+5:30
परप्रांतियांच्या नावाखाली बांग्लादेशीय नागरीकांचा मोठा लोंढा जुन्नर तालुक्यात येत असल्याने भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे़
सचिन कांकरीया, नारायणगाव
परप्रांतियांच्या नावाखाली बांग्लादेशीय नागरीकांचा मोठा लोंढा जुन्नर तालुक्यात येत असल्याने भविष्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे़ नुकतेच दोन बांग्लादेशीय नागरीकांना नारायणगाव पोलीसांनी अटक केल्यानंतर या तालुक्यातील त्यांचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बांग्लादेशीयांना शोेधून काढणे हे पोलीसांपुढील मोठे आव्हान आहे़
नारायणगाव परिसरात गेल्या आठ महिन्यापासून जहॉंंगीर रोबीउल मंडुल (वय ३४) व माश्यद रोबीउल मंडुल (वय २३) दोघे मुळ बांग्लादेशी नारायणगावातील मुक्ताबाई मंदिराजवळ वास्तव्य करीत होते़ इतरही अनेक बांग्लादेशीय नागरीक परिसरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तीन वर्षापूर्वी देखील एका बिल्डरकडे एक बांग्लादेषीय नागरीक वास्तव्यास होता़ पोलीसांनी त्यास मोबाईलच्या साहयाने शोेधून काढले होते.़ त्यालाही पोलीसांना अटक केल्यानंतर त्याने पॅनकार्ड व इतर पुरावे तयार करून भारतीय रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली होती़ त्या बांग्लोदशीय नागरीला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती़ शिक्षा भोगल्यानंतर या नागरीकास त्याच्या मायदेशी पाठविण्यात आले होते़ हा बाग्लांदेशी नागरीक ज्याच्याकडे काम करीत होता़ त्या ठेकेदाराकडे पोलीसांनी चौकशी केली असता तो पश्चिम बंगालमध्ये असल्याचे भासवित होता़ त्याचेकडे त्या भागातील बनावट कागदपत्र देखील उपलब्ध होते.़ पोलीसांनी त्याला कागदपत्र जमा करण्यासाठी सोडले. परंतू तो ठेकेदार संपुर्ण कुटूंबासह रातोरात पसार झाला़ आज त्याचा विकत घेतलेला फ्लॅट बंद अवस्थेत आहे़ अशाच प्रकारे हे दोन देखील बाग्लांदेशी पोलीसांच्या ताब्यात आले आहेत़ त्यांनीही देशांच्या सिमेलगत दलालांना ६ ते ८ हजार रूपये देवून भारतात प्रवेश मिळविला होता़ हे बांग्लादेशी कामधंदयाच्या निमित्ताने पसिरात वास्तव्य करतात़ त्यानंतर स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून रहिवाशी दाखला मिळवतात़
पॅनकार्ड किंवा आधारकार्ड मिळवतात. या दोन्हा कार्डच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अनेक बांग्लादेशी नागरीकांनी स्थानिक रेशनकार्ड देखील मिळविलेले आहे़ आज देखील अनेक बाग्लांदेशी नागरीक वास्तव्यास असल्याची चर्चा परिसरात आहे़
बरेच बांग्लादेशी आल्यानंतर ते परिसरातील हॉटेलमध्ये किंवा बांधकाम व्यवसायामध्ये मोलमजुरी करताना दिसतात़ हे नागरीक व्यावसायिक दृष्टीकोनातून भारतात घुसखोरी करतात. मिळेल तेथे काम करतात वेळप्रसंगी मोलमजुरी करतात. वर्ष दोन वर्ष काम करून पैसे जमा करतात व पश्चिम बंगालच्या हद्दीतून एजंटांना हाताशी धरून बाग्लांदेशाच्या सरहद्दीत प्रवेश करतात़