पिंपळवंडीतील बँकेचे एटीएम व दुकाने फोडणारे चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:43+5:302021-05-11T04:09:43+5:30
राजेंद्र जाधव, कैलास काळे (दोघेही रा. गुरेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर ...
राजेंद्र जाधव, कैलास काळे (दोघेही रा. गुरेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर संतोष उर्फ विजय जाधव हा आरोपी आहे. बुधवारी (दि. ५) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी पिंपळवंडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे या चोरट्यांच्या हाताला काही लागले नव्हते. त्यानंतर त्यांनी पिंपळवंडी स्टॅड येथील लक्ष्मी खानावळ या हाॅटेलच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व हाॅटेलमधील किरकोळ चिल्लर व शीतपेयाच्या बाटल्या चोरी केल्या होत्या. तसेच त्यांनी बाजूला असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. त्या ठिकाणीही त्यांना काही मिळाले नाही. या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोटारवायडिंग दुकानाचे शटर उचकटून किरकोळ चोरी केली. त्यानंतर त्यांनी अस्मिता किराणा या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील काही रक्कम चोरून नेली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजच्या आधारे आळेफाटा पोलिसांनी तपास करून राजेंद्र जाधव व कैलास काळे (दोघेही रा.गुरेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. या घटनेमधील एक आरोपी संतोष उर्फ विजय जाधव फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलकंठ कारखेले, पोलीस नाईक लहानु बांगर, पोलीस अंमलदार महेश काठमोरे, अवि वैद्य यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आळेफाटा पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत या घटनेचा तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल आळेफाटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलकंठ कारखेले, पोलीस नाईक लहानु बांगर, पोलीस अंमलदार महेश काठमोरे, अवि वैद्य यांच्या पथकाने ही कामगिरी केली.