कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या अध्यक्षाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:44+5:302021-02-17T04:16:44+5:30

विलास एकनाथ नांदगुडे (वय ६१, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा, फसवणूक ...

Bank chairman arrested for embezzling crores | कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या अध्यक्षाला अटक

कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी बॅंकेच्या अध्यक्षाला अटक

Next

विलास एकनाथ नांदगुडे (वय ६१, रा. पिंपळे निलख) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा, फसवणूक आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भगवान बोत्रे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना एक एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान घडली. या प्रकरणात आणखी नऊ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. गुन्हा घडलेल्या कालावधीत तो अध्यक्ष होता. गुन्ह्यातील रकमेबाबत तपासणे करणे, बनावट कागदपत्रे कोठे बनवली, इतर गुन्हा दाखल असलेल्यांच्या शोधासाठी, तसेच, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून त्याच्याकडे सखोल तपास करणे आवश्‍यक आहे. यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड. कावेडिया यांनी केली.

Web Title: Bank chairman arrested for embezzling crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.