Pune Crime: बँकेतील कर्मचाऱ्याला 'टास्क'मध्ये अडीच लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
By भाग्यश्री गिलडा | Published: December 22, 2023 01:49 PM2023-12-22T13:49:41+5:302023-12-22T13:50:22+5:30
पुणे : दिवसाला ७०० ते १००० रुपये कमावण्याचे आमिष दाखवून बँकेत काम करणाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
पुणे : दिवसाला ७०० ते १००० रुपये कमावण्याचे आमिष दाखवून बँकेत काम करणाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीने गुरुवारी (दि. २१) पोलिसांना फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ५ जून २०२३ ते ८ जून २०२३ यादरम्यान घडला आहे. रिव्ह्यू चे टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन करून पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला दिला. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करून त्यांना एकूण २ लाख ८९ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा मिळत नसल्याने तक्रारदार यांनी विचारणा केली. तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारदार यांना ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना जबाब दिला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत आहेत.