टँकरखाली सापडून दुचाकीस्वार बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 14:46 IST2019-04-29T14:45:31+5:302019-04-29T14:46:03+5:30
सिंहगड रोडवर भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़.

टँकरखाली सापडून दुचाकीस्वार बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू
पुणे (नऱ्हे ) : सिंहगड रोडवर भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला़. नवीन चंद्राबी (वय ३१, रा़ शिवम राज अपार्टमेंट, मुळ हैदराबाद) असे त्याचे नाव आहे़ हा अपघात सिंहगड रोडवरील अभिरुची मॉलसमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजता झाला़.
नवीन चंद्राबी हे धायरीकडून स्वारगेटकडे मोटरसायकलवरुन चालले होते़. ते स्टेट बँकेच्या बाजीराव रोड शाखेत कामाला होते़ त्यांनी हेल्मेटही घातलेले होते़. सिंहगड रोडवरील एमएसईबी कार्यालयासमोर ते आले असताना त्याच्या बाजूने जाणाऱ्या टँकरच्या चालकाने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने ते मागच्या चाकाखाली येत रस्त्यावर पडले़. त्यात चंद्राबी यांचा जागीच मृत्यू झाला़ सिंहगड रोड पोलिसांनी टँकरचालक शकील सय्यद इटगी याला अटक केली आहे़.