पुण्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करून केली बँकेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 03:33 PM2021-10-27T15:33:42+5:302021-10-27T15:47:21+5:30

धनकवडी : शासकीय अधिकाऱ्यांच्या चेक व सही शिक्क्यांचा दुरुपयोग करून बँकेची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ...

bank fraud misuse names government officials five arrested in pune | पुण्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करून केली बँकेची फसवणूक

पुण्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करून केली बँकेची फसवणूक

Next

धनकवडी : शासकीय अधिकाऱ्यांच्या चेक व सही शिक्क्यांचा दुरुपयोग करून बँकेची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी संगनमताने सातारा रस्त्यावरील नामांकित बँकेची फसवणूक केली, तर अधिक तपासात यवतमाळमधील एका बँकेतून २८ लाख रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे. विश्वनाथ आनंद किरतावडे (४८, धनकवडी), सुदेश मधुकर आव्हाड (५८, कोंढवा), सागर प्रेमचंद पारख (३८, येरवडा), श्रवण मल्लय्या तागलापोल्ली (२८, चंद्रपूर) , विकास मुनलाल यादव (३०, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बँके च्या शाखा प्रबंधकाने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास सातारा रस्त्यावरील एका बँकेत अगरतळा महापालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटवन्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्यातील अंमलदार सागर शिंदे आणि प्रदीप बेडीस्कर यांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकातील पोलीस आधिकारी सुधीर गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून किरतावडे याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार आव्हाड आणि पारख यांनाही ताब्यात घेण्यात आले.

त्याचबरोबर आणखी दोन साथीदारांबाबत माहिती मिळाली असता त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्यांना ही डेक्कन येथून (श्रवण आणि विकास ) ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बनावट चेकद्वारे चंदिगढ येथील मुख्य लेखापाल यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खात्यातून २८ लाख रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता श्रवण आणि विकास यांच्यावार चंदिगढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्यांना आणखी कुणी मदत केली आहे का? याबाबत सहकारनगर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई, पोलिस निरीक्षक (गुन्हे) युनूस मुलानी, सहायक निरीक्षक मोहसीन पठाण, पोलिस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, अमलदार बापू खुटवड, अरुण मोहिते, महादेव नाळे, सागर शिंदे, प्रदीप बेडिस्कर आदींचा पथकाने केली.

Web Title: bank fraud misuse names government officials five arrested in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.