सर्वांचे हित जपण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:13 AM2021-02-16T04:13:35+5:302021-02-16T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहक आणि उद्योजक या दोघांना एकाच व्यासपीठावर व्यवसाय आणि खरेदीच्या संधी उपलब्ध करून देणे ...

Bank of Maharashtra is committed to safeguarding the interests of all | सर्वांचे हित जपण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध

सर्वांचे हित जपण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कटिबद्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्राहक आणि उद्योजक या दोघांना एकाच व्यासपीठावर व्यवसाय आणि खरेदीच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, असा विश्वास बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी व्यक्त केला.

बँकेतर्फे आयोजित ‘मेगा रिटेल लोन एक्स्पो’चे उदघाटन राजीव यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा, शहर प्रबंधक व्ही. पी. श्रीवास्तव, पूर्व क्षेत्रीय प्रबंधक वीणा राव, पश्चिम क्षेत्रीय प्रबंधक प्रशांत दास आदी या वेळी उपस्थित होते.

या एक्स्पोत बांधकाम, ऑटोमोबाईल, सोनेतारण, शिक्षण व विमा क्षेत्रातील सुमारे २५ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप तसेच सुमारे ५० कोटी रुपयांचे नवीन कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यात आले. कर्ज मंजूर झालेल्या ग्राहकांना राजीव यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. सूत्रसंचालन शिवांगी राय यांनी केले. दास यांनी आभार मानले.

-----

फोटो ओळी : कर्जवाटपाचे धनादेश देताना डावीकडून यू. आर. राव, व्ही. पी. श्रीवास्तव, ए. एस राजीव, ग्राहक साधना खुटवड, वीणा राव व प्रशांत दास.

Web Title: Bank of Maharashtra is committed to safeguarding the interests of all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.