बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सोमवार पेठ येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:39+5:302021-03-09T04:14:39+5:30

केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्ही. पी. श्रीवास्तव यांनी सर्व सामान्य ग्राहकांना सुटयांच्या कालावाधी सह बँकिंग वेळे व्यतिरिक्त ही बँकेच्या सेवेचा ...

Bank of Maharashtra launches customer service center at Peth on Monday | बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सोमवार पेठ येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू

बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सोमवार पेठ येथे ग्राहक सेवा केंद्र सुरू

googlenewsNext

केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्ही. पी. श्रीवास्तव यांनी सर्व सामान्य ग्राहकांना सुटयांच्या कालावाधी सह बँकिंग वेळे व्यतिरिक्त ही बँकेच्या सेवेचा लाभ मिळणार असून सर्वसामान्यांना बचत खाते उघडणे,पेन्शन धारकांना पेन्शनचे पैसे काढणे,पैसे हस्तांतर करणे,विद्यार्थ्यांना बचत खाते उघडण्यापासून ते शिष्यवृत्तीचे पैशाचे व्यवहार ,बचत गटातील अंतर्गत व्यवहार पैसे काढणे अथवा भरणा करणे ,थोडक्यात पैशाचे छोट्या प्रमाणातील सर्व व्यवहार या ग्राहक सेवा केंद्रा मार्फत होणार असल्याने ग्राहकांना निश्चितच त्याचा लाभ होऊन त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे

या सेवा केंद्रामार्फत केंद्र शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ सर्व सामान्यांना मिळणे कामी बँकेने पुढाकार घेतला असून केंद्रामार्फत “ मनरेगा ‘’ “प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ‘’ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ‘’ व अटल पेन्शन योजना या योजनांचाही लाभ घेऊन स्वत: बरोबरच आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे व्ही. पी. श्रीवास्तव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र च्या ग्राहक सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले

सदर कार्यक्रमास राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उप महाव्यवस्थापक बाळासाहेब टावरे साहेब, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी तसेच बँक कर्मचारी व मोठ्या संख्येने बँकेचे ग्राहक उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Bank of Maharashtra launches customer service center at Peth on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.