बँक आॅफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:42 AM2018-07-01T00:42:40+5:302018-07-01T00:42:54+5:30
बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचा-यांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पुणे : बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे आणि कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांचे सर्व अधिकार काढून घेतल्याच्या निषेधार्थ बँकेच्या क र्मचाºयांनी शनिवारी शिवाजीनगर येथील लोकमंगल या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शहरातील बँक आॅफ महाराष्ट्राच्या विविध शाखा कार्यालयातील कर्मचाºयांनी हाताला काळ्या रीबन लावून निषेध नोंदविला.
संचालकांंना अटक ही घटना निषेधार्ह आहे. बँक आॅफ महाराष्ट्राच्यावतीने पुढील आठवड्यात आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार असून तोपर्यंत सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. देशभरात बँक आॅफ महाराष्ट्रच्या १८५० पेक्षा जास्त असून कर्मचाºयांची संख्या १४ हजारांहून अधिक आहे. यापुढील काळात शासनाला कर्मचा-यांंची ताकद दाखवून देऊ. येत्या ५ आणि ६ तारखेला युनायटेड फोरमच्यावतीने कृती कार्यक्रम ठरविणार असल्याचे सरचिटणीस शैलेश टिळेकर यांनी सांगितले.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना कर्ज देताना नियमांना बगल दिल्याच्या आरोपावरून अटक झाल्याने मराठे आणि गुप्ता यांच्याकडील अधिकार शुक्रवारी काढून घेण्यात आले. कारवाईचा निषेध करण्यासाठी बँकेच्या कर्मचाºयांनी शनिवारी तातडीने बैठक घेत युनायटेड फोरम आॅफ महाबँक युनियनची स्थापना केली. त्यामध्ये ३० जून ते ५ जुलैपर्यंत निषेध सप्ताह पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ६ जुलै रोजी आंदोलनाची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.
एकत्र येण्याची गरज
बँकेचे देशभरातून २ कोटी ६८ लाख ग्राहक आहेत. त्यांच्यापर्यंत जाणारा संदेश हा चुकीचा असून, सरकारकडे दाद मागण्यासाठी आणि बँकेच्या अस्तित्वासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मराठे यांच्या अटकेमागील राजकारण ओळखावे लागेल. मात्र, यामुळे सामान्य माणसाकरिता असलेली बँक आॅफ महाराष्ट्र नष्ट होऊ देणार नाही, असे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.