Pune: बँक मॅनेजरनेच घातला १३ कोटींचा गंडा; बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

By भाग्यश्री गिलडा | Published: January 25, 2024 09:14 PM2024-01-25T21:14:43+5:302024-01-25T21:16:07+5:30

याप्रकरणी बँक मॅनेजर आणि इतर चारजणांवर फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला आहे....

bank manager himself made a scam of 13 crores; Fraud of the builder | Pune: बँक मॅनेजरनेच घातला १३ कोटींचा गंडा; बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

Pune: बँक मॅनेजरनेच घातला १३ कोटींचा गंडा; बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक

पुणे : कर्ज मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर १३ कोटींचे कर्ज काढून बँक मॅनेजरने फसवणूक केली. याप्रकरणी बँक मॅनेजर आणि इतर चारजणांवर फसवणुकीचा गुन्हा नाेंदविला आहे.

याबाबत गौरव सुनील सोमाणी (वय ३४, रा. बिबवेवाडी) यांनी बंड गार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बँक मॅनेजर शाहबाज जाफर (रा. मंजुश्री कॉम्प्लेक्स बँक रोड, पुणे), विजय रायकर (रा. माणिकबाग, सिंहगड रोड), महेश भगवानराव नलावडे आणि मंदाकिनी महेश नलावडे (रा. दोघेही महादेवनगर, मांजरी) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २०२० ते २०२४ या काळात घडली आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी गौरव सोमाणी यांनी साई प्लॅटेनियम व्हेंचर फर्मच्या नावे २०१९ मध्ये हिंजवडी-माण येथे बांधकामासाठी ७१ गुंठे मोकळी जागा विकत घेतली होती. या जागेवर निवासी प्रकल्प उभा करण्यात येणार होता. या बांधकाम प्रोजेक्टसाठी कर्ज घेण्यासाठी पिंपरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे जाऊन जागेच्या कागदपत्राची फाईल आरोपी बँकेचे मॅनेजर शाहबाज जाफर यांच्याकडे दिली होती.

शाहबाज यांनी ती फाईल स्वतःकडे ठेवून बांधकाम झाले नसतानाही बांधकाम झाल्याचे दाखवून बनावट कागदपत्रे बनवली. फिर्यादींच्या बनावट सह्या करून त्यावर तब्बल २५ कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले. त्या कर्जातून ६.५ कोटी रक्कम आरोपीने स्वतःच्या ओळखीतल्या असलेल्या महेश नलावडे, मंदाकिनी नलावडे आणि विजय रायकर यांच्या खात्यात वर्ग करून जमा केली. त्यानंतर बँकेकडून कर्ज थकबाकीच्या नोटीस प्राप्त झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर करत आहेत.

Web Title: bank manager himself made a scam of 13 crores; Fraud of the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.