चालू वर्षात २२ दिवस कामाच्या दिवशी बँकांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 05:07 AM2020-01-06T05:07:23+5:302020-01-06T05:07:29+5:30
देशभरातील खासगी आणि सार्वजनिक बँकांना रविवारी साप्ताहिक सुटी असते.
पुणे : देशभरातील खासगी आणि सार्वजनिक बँकांना रविवारी साप्ताहिक सुटी असते. तर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांचे कामकाज बंद असते. याशिवाय प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र राज्य स्थापना दिन, स्वातंत्र्यदिन, रामनवमी, जन्माष्टमी, दसरा, दिवाळी, होळी, गुडफ्रायडे, गांधी जयंती,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा विविध दिवशी बँकांना सुटी दिली जाते. या वर्षी तब्बल २२ सुट्या या कामाच्या दिवशी आल्या आहेत. याशिवाय यात जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या काही सुट्यांचादेखील समावेश होईल.
यंदा प्रजासत्ताक दिन (दि. २६ जानेवारी) रविवारी येत आहे. मात्र, पोंगल, वसंत, पंचमी, महाशिवरात्री, होळी, रामनवमी, महावीर जयंती, गुडफ्रायडे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, दसरा, ईद ए मिलाद, महर्षी वाल्मीकी जयंती, भाऊबीज सोमवार ते शुक्रवार या दिवशी येत आहे; तर ख्रिसमस (दि. २५ डिसेंबर) शुक्रवारी येत आहे. त्यानुसार नागरिक आणि व्यावसायिकांनादेखील बँकांच्या कामाचे नियोजन करावे लागेल.