पालिकेत सोशल मीडियाला बंदी
By admin | Published: June 1, 2015 05:35 AM2015-06-01T05:35:27+5:302015-06-01T05:35:27+5:30
महापालिकेत सोशल मीडियाचा वापरास बंदी घालण्यात आली असून, त्यातुळे टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
सुवर्णा नवले, पिंपरी
महापालिकेत सोशल मीडियाचा वापरास बंदी घालण्यात आली असून, त्यातुळे टाइमपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता चाप बसणार आहे.
महापलिकेत ८ हजार कर्मचारी काम करतात. मुख्य भवनातील सर्व्हर कक्षात नवीन फ ायरवॉल बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या इंटरनेट यंत्रणा विस्कळीत झाली आहे. नेट वापराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाचा वापर करतात, असे निदर्शनास आले. त्यामुळे ई-गव्हर्नन्स विभागाने आता सोशल साइटसह करमणुकीच्या साधनांचा गैरवापरांवर निर्णय नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे सोशल मीडियाचा वापर गरजेचा आहे, अशा विभागांनाच परवानगी दिली जाणार आहे.