नैराश्यातून बाप-लेकीची आत्महत्या

By Admin | Published: May 5, 2017 03:00 AM2017-05-05T03:00:30+5:302017-05-05T03:00:30+5:30

ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणुकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसल्याने नैराश्यातून पिसोळी येथील

Bap-Leki's suicide by depression | नैराश्यातून बाप-लेकीची आत्महत्या

नैराश्यातून बाप-लेकीची आत्महत्या

googlenewsNext

पुणे/उंंड्री : ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणुकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसल्याने नैराश्यातून पिसोळी येथील राहत्या घरी बाप-लेकीने विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांनी पाचपानी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली.
डॉ. किरण देवेंद्र पाटील (वय ६१, रा. किंग्स्टन एलिसिया सोसायटी, पिसोळी) आणि नियाता किरण पाटील (वय १८, रा. किंग्स्टन एलिसिया सोसायटी, पिसोळी) अशी मृत बाप-लेकींची नावे आहेत. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर, उपनिरीक्षक पावसे, गणेश कुल्लाळ, रवींद्र भोसले, रमेश राठोड, सचिन शिंदे, विजय गायकवाड, अमोल शिंदे घटनास्थळी पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा कोणीही उघडत नसल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. दरवाजा तोडल्यानंतर दोघांचे मृतदेह खुर्चीत बसलेल्या अवस्थेत आढळले. आठ दिवसांपूर्वीच दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
पाटील यांचे कुटुंब मूळचे ठाण्याचे असून, काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त ते पुण्यात आले होते. एका खासगी कंपनीत काम करीत असलेले डॉ. किरण पाटील नोकरीतून निवृत्त झाले होते. मुलगी एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
(प्रतिनिधी)

गुंतवणुकीतून आर्थिक फटका
आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये ई-कॉमर्स कंपनीत पैशाची गुंतवणूक केल्याचा आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे याचा उल्लेख करण्यात आला आहे. पत्नीने मार्च २०१५ मध्ये कौटुंबिक हिंसाचार (४९८ कलम) अंतर्गत पाटील यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यामुळे दोन वर्षांपासून ती मुंबई येथे वास्तव्यास आहे.

Web Title: Bap-Leki's suicide by depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.