शेतीमाल आणण्यास सुरक्षा पुरवू : बापट

By Admin | Published: June 4, 2017 05:36 AM2017-06-04T05:36:32+5:302017-06-04T05:36:32+5:30

शेतकरीच शेतीमाल विक्रीसाठी तयार नाही. त्यामुळे शेतीमालाचा तुटवडा निर्माण होत आहे. परंतु, ज्यांची शेतीमाल विकण्याची तयारी असेल त्यांना शासनाकडून

Bapat: Provide security to bring food | शेतीमाल आणण्यास सुरक्षा पुरवू : बापट

शेतीमाल आणण्यास सुरक्षा पुरवू : बापट

googlenewsNext

पुणे : शेतकरीच शेतीमाल विक्रीसाठी तयार नाही. त्यामुळे शेतीमालाचा तुटवडा निर्माण होत आहे. परंतु, ज्यांची शेतीमाल विकण्याची तयारी असेल त्यांना शासनाकडून सुरक्षाव्यवस्था पुरविली जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. बापट म्हणाले, की भाजीपाला व दुधाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोणीही चढ्या भावाने शेतीमाल व दुधाची विक्री करू नये, याबाबत काळजी घेतली जात आहे.
शेतकऱ्यांचा शेतीमाल त्यांच्या घरातून जमा केला जाऊ शकत नाही. तुटवडा निर्माण झाला की भाववाढ होतेच. मात्र, लवकरच ही स्थिती पूर्वपदावर येईल.

Web Title: Bapat: Provide security to bring food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.