पुण्यातला ‘बाप्पा’ जर्मनीत होणार विराजमान; तुळशीबागेच्या गणपतीची प्रतिकृती सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:19 AM2023-09-11T11:19:54+5:302023-09-11T11:26:43+5:30

युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली...

'Bappa' of Pune will sit in Germany; Replica of Ganpati from Tulsi Bagh across Satasamudra | पुण्यातला ‘बाप्पा’ जर्मनीत होणार विराजमान; तुळशीबागेच्या गणपतीची प्रतिकृती सातासमुद्रापार

पुण्यातला ‘बाप्पा’ जर्मनीत होणार विराजमान; तुळशीबागेच्या गणपतीची प्रतिकृती सातासमुद्रापार

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सवाची ख्याती केवळ पुण्यात नव्हे, तर जगभरात पोहोचली आहे, त्यामुळे आता पुण्याचा गणेश उत्सव जर्मनीत साजरा होणार आहे. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळ म्युनिक या मराठी भाषिकांच्या युरोपमधील एका अग्रणी संस्थेतील गणेशोत्सवात विराजमान होणार आहे.

युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली. रांध्याच्या पर्यावरणपूरक मटेरीअलपासून ही मूर्ती साकारण्यात आली असून, जर्मनीतील संस्थेचे प्रतिनिधी अद्वैत खरे यांच्याकडे ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, गणेश रामलिंग, कोषाध्यक्ष नितीन पंडित, स्वप्नाली पंडित, शिल्पकार विवेक खटावकर, सागर पेद्दी, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र मंडळ म्युनिकला गणेशोत्सवासाठी श्रीगणेशाची मूर्ती देणे आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या वार्षिक गणेशोत्सवामध्ये मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना व पूजा करणे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या विविध सांस्कृतिक उपक्रमांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत देणे. महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या “मायमराठी” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके आणि म्युनिकमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा अन्य साहाय्य करणे तसेच म्युनिकच्या पालवी दिवाळी अंकाला आर्थिक साहाय्य करण्याचे संस्था व तुळशीबाग मंडळामध्ये निश्चित झाले आहे.

Web Title: 'Bappa' of Pune will sit in Germany; Replica of Ganpati from Tulsi Bagh across Satasamudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.