बाप्पासंग, ‘ती’च्या सेल्फीचे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:26 AM2017-09-02T01:26:02+5:302017-09-02T01:26:12+5:30
स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ मिळाले. यंदाच्या वर्षी ‘लोकमत’च्या वतीने महिलांना सन्मान देण्यासाठी आर‘ती’चा तास हा उपक्रम राबविला होता. त्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आत बाप्पांसोबतच्या ‘सेल्फी’च्या मोरपंखी आठवणी ‘लोकमत’च्या साथीने जतन करण्याची संधी मिळणार आहे. आपला सेल्फी ‘लोकमत’कडे 9923378476 वर पाठवा. निवडक सेल्फीजना ‘लोकमत’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. सर्वोत्कृष्ट सेल्फीला आकर्षक बक्षीस मिळणार आहे. रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत, सिस्काच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जात आहे. पीएफटी हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर असून, धीरेंद्र अॅडव्हर्टायझिंग आऊटडोअर पार्टनर आहेत.