नीरा ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांच्या हस्ते बप्पाची आरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:25+5:302021-09-19T04:12:25+5:30
नीरा : पुरुषप्रधान असलेल्या आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी महिलांना डावलले जाते. आरक्षणामुळे महिलांना राजकारणात व नोकरीत संधी मिळाली; पण ...
नीरा : पुरुषप्रधान असलेल्या आपल्या देशात बऱ्याच ठिकाणी महिलांना डावलले जाते. आरक्षणामुळे महिलांना राजकारणात व नोकरीत संधी मिळाली; पण आजही धार्मिक कार्यक्रमात तितकेसे मानाचे स्थान महिलांना मिळत नसते. हीच खंत ओळखून लोकमत माध्यम समूहातर्फे 'तीचा गणपती, तीची आरती' या उपक्रमांतर्गत गणेशोत्सव साजरा होत आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा येथील ४८ गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. नीरा पोलीस दूरक्षेत्रात मागील वर्षी ही एकाच ठिकणी गणेशोत्सव साजरा केला गेला होता. पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवाआधी झालेल्या बैठकीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याची विनंती केली होती. त्याला सर्व ४८ गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
यावेळी भरत निगडे यांनी लोकमत तीचा गणपती, तीची आरती ही संकल्पना सांगितली. यावेळी नीरा ग्रामपंचायतीच्या सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांच्या समोर मांडली. त्याला प्रतिसाद देत नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली काळे, राधा माने, सारिका काकडे, शशिकला शिंदे, वर्षा जावळे, प्रियंका झुंजूरके यांच्या हस्ते बप्पाची आरती करण्यात आली.
--
१८ नीरा तीचा गणपती