पांढरेवाडीला १ लाखाची कुस्ती बापू मंडलेने जिंकली
By admin | Published: April 21, 2015 03:06 AM2015-04-21T03:06:01+5:302015-04-21T03:06:01+5:30
पांढरेवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १ लाख ११ हजार १११ रुपयांची कुस्ती बापू मंडले,
कुरकुंभ : पांढरेवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १ लाख ११ हजार १११ रुपयांची कुस्ती बापू मंडले, विलास डोईफोडे यांच्यामध्ये होऊन बापू मंडले यांनी बाजी मारून इनामी कुस्ती जिंकली.
पांढरेवाडी महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर आणि विविध मल्लांच्या उपस्थित येथे कुस्त्या पार पडल्या. भैरवनाथ यात्रा-उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी छबिना, फटाक्यांची आतषबाजीने झला. या वेळी येथील दौंड तालुका कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी महाराष्ट्रातील विविध नामवंत मल्लांनी हजेरी लावली. पंचक्रोशीतील सर्वांत मोठ्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनाची कुस्ती साईराज व शंभुराजे जगताप यांच्यामध्ये झाली. चांदीच्या गदेसाठी शुभम येळवंडे-अभय सपकाळ यांच्यामध्ये कुस्ती झाली.
आमदार राहुल कुल, साहेबराव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष स्वप्निल शितोळे, सतीश जगताप, युवराज जाधव, बबलू देशमुख अनिल झगडे, प्रशांत भागवत, समाधान पाटील, मारुती जाधव तसेच कुस्तीशौकिनांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी मारुती कृष्णाजी निंबाळकर यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा देण्यात आली. (वार्ताहर)