बारामतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:45+5:302020-12-24T04:10:45+5:30
बारामती: कोरोनाच्या आपत्तीमध्ये छोटे मोठे व्यावसाययिक डबघाईला आले. रोजगार गेले.परीणामी अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.त्यामुळे ...
बारामती: कोरोनाच्या आपत्तीमध्ये छोटे मोठे व्यावसाययिक डबघाईला आले. रोजगार गेले.परीणामी अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.त्यामुळे सरसकट वीजबिल माफी करा,या मागणीसाठी मंगळवारी(दि २२) बारामतीत रिपब्लिकन युवा मोर्चा व बारामतीतील बहुजन संघटनांचे प्रतिनिधी तसेच वीजबिल धारकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
महावितरणच्या प्रवेशद्वारा समोर झालेल्या आंदोलनात अजय लोंढे, अनिल मोरे, आनंद काकडे, संदीप बनसोडे, भारत अहिवळे, शुभम अहिवळे, विलास पोमणे, योगेश महाडीक, आनंद माने आदींनी सहभाग घेतला.यावेळी महावितरणचे अभियंता प्रकाश देवकाते व धनंजय गावडे यांना या प्रसंगी निवेदन देण्यात आले. कोरोनाकाळात जर वीजबिलांच्या अडचणीबाबत संबंधितांच्या सर्व भावना शासनदरबारी पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
बारामती येथे सरसकट वीजबिल माफीसाठी मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
२३१२२०२०-बारामती-१३