बारामतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:26+5:302021-05-26T04:10:26+5:30

बारामती :कडक निर्बंधांनंतर बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बारामतीकरांना रुग्णसंख्या आटोक्यात येईपर्यंत ...

In Baramati | बारामतीत

बारामतीत

Next

बारामती :कडक निर्बंधांनंतर बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बारामतीकरांना रुग्णसंख्या आटोक्यात येईपर्यंत आणखी दक्षता घेण्याची गरज आहे. सरासरी प्रतिदिन ४०० आढळणारी रुग्णसंख्या सध्या २०० ते २५० प्रतिदिनपर्यंत घसरली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार: २२ मेचे एकूण आरटीपीसीआर नमुने ५३१. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१०४. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -११. २४ मे तालुक्यामध्ये खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण आरटीपीसीआर ६९- त्यापैकी पॉझिटिव्ह २५. कालचे एकूण ॲंटिजन -१००. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-३३ काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहर- ६८ ग्रामीणच्या ९४ रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत सापडलेली एकूण रुग्णसंख्या-२३ हजार ३९६ आहे. एकूण बरे झालेले रुग्ण- २०हजार ६८८ रुग्ण आहेत. मंगळवारी (दि. २५) २८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. तसेच सोमवारी (दि. २४) बारामती तालुक्यामध्ये काऱ्हाटी, कोराळे बुद्रुक व सावळ येथे ॲंटिजन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण २१६ संशयितांची ॲंटिजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.आजपर्यंत सापडलेली एकूण रुग्णसंख्या २३हजार ६५५ झालेली आहे. काल दिवसभरातील रुग्णसंख्या १७२ झालेली आहे.

Web Title: In Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.