बारामती कृषी विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:04+5:302021-09-05T04:14:04+5:30

बारामती: येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भेट देत आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये ...

Baramati Agricultural Science | बारामती कृषी विज्ञान

बारामती कृषी विज्ञान

googlenewsNext

बारामती: येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये महाराष्ट्रातील विविध कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भेट देत आहेत.

प्रत्येक आठवड्यामध्ये सुमारे १५० विद्यार्थी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती व कार्य अनुभव घेण्यास हे विद्यार्थी येत आहेत. विद्यार्थी याठिकाणी विविध विषयातील कार्यानुभव घेत आहेत. त्यांना केंद्रामध्ये इंडो-डच तंत्रज्ञानावर आधारित भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये भाजीपाला कलम तंत्रज्ञान व भाजीपाला निर्यातबाबत मार्गदर्शन, तसेच जिवाणू खते व औषधे बनवण्याच्या प्रयोगशाळेत खते व औषधे निर्मितीबाबत प्रात्यक्षिके फळ व रोपवाटिकेमध्ये विविध कलम तंत्रज्ञान व रोपवाटिका व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन, गांडूळ खत उत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मुक्तसंचार गोठा, मधुमक्षिका पालन इत्यादी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्षात कार्यानुभवातून देण्यात येत आहे.

ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी संलग्न झाले आहेत कृषी विज्ञान केंद्रामार्फत संतोष गोडसे विषय विशेषज्ञ कृषी विस्तार तसेच कृषी महाविद्यालय बारामतीमार्फत प्रा. संदीप गायकवाड, उपप्राचार्य कृषी महाविद्यालय बारामती, प्रा. आरती भोईटे, प्रा. समीर बुरुंगले यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कामकाजाची प्रत्यक्ष माहिती व कार्यानुभव घेण्यास आलेले विद्यार्थी.

०४०९२०२१-बारामती-०३

Web Title: Baramati Agricultural Science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.