बारामती विधानसभा मतदार याद्यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:15 AM2021-09-16T04:15:25+5:302021-09-16T04:15:25+5:30
बारामती: बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम ...
बारामती: बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम निर्धारित केला आहे.
९ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुनर्निरीक्षण उपक्रमामध्ये १ नोव्हेंबर रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणे. दि. २० डिसेंबर रोजी दावे व हरकती निकालात काढणे. विशेष मोहिमांचा कालावधी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून निश्चित केलेले दिवस प्राप्त होताच प्रसिध्दी देण्यात येणार आहे. दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगितले.