बारामतीत भोंदूची ‘दादागिरी’

By admin | Published: July 29, 2015 12:10 AM2015-07-29T00:10:26+5:302015-07-29T00:10:26+5:30

तेरा बच्चा खून की उलटी करेगा । बिमार होके मरेगा । ऊसे २ हजार ५०० रुपये का कफन खरीद, उसकी अर्थी को खंदा देणे मै आऊंगा ।

Baramati Bhondu's 'Dadagiri' | बारामतीत भोंदूची ‘दादागिरी’

बारामतीत भोंदूची ‘दादागिरी’

Next

- प्रशांत ननावरे, बारामती
तेरा बच्चा खून की उलटी करेगा । बिमार होके मरेगा । ऊसे २ हजार
५०० रुपये का कफन खरीद, उसकी अर्थी को खंदा देणे मै आऊंगा ।
चिंता मत करना बेटा... हा कोणत्याही चित्रपटातील संवाद नाही. तर एका कथीत भोंदूने बारामतीकर नागरिकांवर दाखविलेली ‘दादागिरी’ आहे.
पोस्टाने पाठविलेले दैवी ताकत असलेले कवच पैसे भरून न घेतल्याने हा भोंदू मोबाईलवर फोन करून, एसएमएस पाठवून धमकी देत आहे. त्यामुळे बारामतीकर कमालीचे धास्तावले आहेत.
बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरातील नागरिकांनी धार्मिक श्रद्धेतून कौटुंबिक सुरक्षिततेसाठी जानेवारी महिन्यात कवच घेतले होते. सिमला येथून हे कवच आल्याचे पार्सलवर नमूद आहे. त्यासाठी या नागरिकांनी प्रत्येकी २ हजार ५०० रुपये खर्च केले.
तुमच्या मोबाईल क्रमांकाची भाग्यवान ग्राहक म्हणून निवड झाली आहे. दैवी कृपा असलेले कवच तुम्हाला पाठविण्यात येत आहे,
असा भावनात्मक संवाद या नागरिकाशी संबंधितांनी साधला. यावेळी फोनवर धार्मिक मंत्रोपच्चार, मंत्र पठण देखील त्या नागरिकाला ऐकू जातील, याची दक्षता घेण्यात
आली. त्यामुळे प्रभावित होऊन त्याने कवच घेतले. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा हे कवच पार्सल पाठविण्यात आले.
मागणी केलेली नसताना हे पार्सल पाहून आश्चर्यचकीत झालेल्या नागरिकाने हे कवच परत पाठविले. त्यानंतर भोंदूचे खरे स्वरूप उघड झाले. २ हजार ५०० रुपये भरून कवच स्वीकारण्यासाठी एसएमएस, मोबाईलद्वारे धमकाविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

आपका बेटा मर गया है ... आप घर चले जावो... गुरूजी की सर्प ने उसे मारा है... कफन लेकर जाना ... बेटा मंदिर का अपमान करोगे तो परेशान रहोगे... कवच वापस होने से दुर्घटना घटेगी । पूत्र धन कार्य की हानी होगी । तेरा वंश आगेभी नही बढेगा । तेरे बच्चो की कुंडली भेजी थी । वह वापस आनेसे अग्निकुंडमे भस्म कर दीया जाएगा । भगवान कोप करेगा । सर्प कुत्ता बच्चे को काटेगा,
असे धार्मिक संकटाचे भीती घालणारे एसएमएस या नागरिकाला पाठविण्यात येत आहेत.

मोबाईलवरूनही धमकावणी
एसएमएसला प्रतिसाद न दिल्याने भोंदूने चक्क मोबाईलवर संपर्क साधून धमकाविण्यास सुरुवात केली आहे. ‘मेरे खिलाफ पोलीस कंम्पलेंट करोगे, फिरभी कुछ नही होगा’ असे सांगण्यास देखील हा भोंदू विसरला नाही.
शहरातील प्रगतीनगर परिसरात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. धार्मिक श्रद्धेतून कौटुंबिक सुरक्षिततेच्या भावनेतून घेतलेले कवच बारामती नागरिकरांसाठी डोकेदुखी बनले आहे.
आता हे नागरिक पोलिसात तक्रार करणार आहेत. शहरात अशा प्रकारे भोंदूबाबांकडून फसवणूक झालेल्या नागरिकांची मोठी संख्या असण्याची शक्यता आहे.

Web Title: Baramati Bhondu's 'Dadagiri'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.