काही वेळातच बारामती शहर झाले चकाचक
By admin | Published: June 26, 2017 03:35 AM2017-06-26T03:35:09+5:302017-06-26T03:35:09+5:30
संत तुकाराम महाराजांची पालखीने बारामतीतून प्रास्थान ठेवल्याबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पालखी तळापासून
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : संत तुकाराम महाराजांची पालखीने बारामतीतून प्रास्थान ठेवल्याबरोबर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पालखी तळापासून ते मुख्य मार्गांपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली. त्यामुळे अवघ्या काही वेळातच बारामती स्वच्छ आणि चकाचक झाली. त्यानंतर निर्जंतुकीकरणाची फवारणीदेखील करण्यात आली. निर्मलवारी अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. त्याचबरोबर नगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येदेखील सोय झाली.
बारामतीच्या शारदा प्रांगणात भव्य शामियानात तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम असतो. काल सायंकाळी पालखीचे आगमन झाल्याबरोबर आरती झाली. त्यानंतर अवघी बारामती भक्तीरसात न्हाऊन निघाली. रात्रभर तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शंनासाठी भक्तांची रांग लागली. ती सकाळी देखील पालखी प्रस्थानापर्यंत तशीच होती.
नियोजित वेळेनुसार पालखीने प्रस्थान ठेवले. त्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात पालखी तळासह मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.
आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांनी यासाठी तातडीने नियोजन केले.
पालखीच्या देखभालीची जबाबदारी सुनील धुमाळ यांच्याकडे होती. यासह नगरपालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आदींनी विशेष लक्ष पुरविले.
पालखीतळ काही वेळातच चकाचक झाला. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांचीदेखील स्वच्छता करण्यात आली.