बारामती क्राईम ब्रँचच्या कारवाईंचे शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 08:01 PM2019-12-03T20:01:17+5:302019-12-03T20:02:34+5:30

सात महिन्यात ११४ अवैध धंद्यावर कारवाई

Baramati Crime Branch clear 100 crime cases | बारामती क्राईम ब्रँचच्या कारवाईंचे शतक

बारामती क्राईम ब्रँचच्या कारवाईंचे शतक

googlenewsNext
ठळक मुद्दे७ कोटी ५ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त

बारामती : बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने  अवैध धंद्यावरील कारवाईने शतक ओलांडले आहे.या पथकाने  सात महिन्यात ११४ अवैध धंद्यावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ७ कोटी ५ लाख ४५ हजारांचा ऐवज जप्त  करण्यात आला आहे. कारवाईमध्ये एकुण १५ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वाधिक ४६ जुगार अड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी ९ मार्च २०१९ रोजी बारामती विभाग बारामती पुणे ग्रामीण या पदाचा कार्यभार स्वीकारला.यावेळी मीना यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके , पोलीस अधीक्षक  संदीप पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागामध्ये आज पर्यंत मोठ्या प्रमाणातअवैध धंद्यांवर कारवाई केली.यामध्ये बारामती विभागीतील बारामती शहर,बारामती तालुका, वडगाव निंबाळकर,इंदापुर, वालचंदनगर, भिगवण, दौड, यवत,शिरूर, रांजणगाव, शिकापुर, सासवड, जेजुरी, भोर, राजगड या वरील १५ पोलीसस्टेशन हद्दितील मोठया प्रमाणावर चालु असलेले अवैध धंदयाविषयी गोपनिय माहिती घेवुन मोठया प्रमाणात छापे घातले.संबंधितांवर गुन्हे दाखल करूनकडक कारवाई केली. लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान या कारवाईचा मोठयाप्रमाणावर परिणाम दिसुन आला.
 या  कालावधीमध्ये  मिना  यांनी बारामती काईम ब्रॉच पथकाचे प्रमुख पोलीसनिरीक्षक  चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार  संदिप जाधव, सुरेंद्र वाघ,स्वप्नील अहिवळे,  दशरथ कोळेकर, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक भाऊसोमोरे,  रॉकी देवकाते, आणि जलद कृती दलाचे जवानांसह आज पर्यंत ११४ अवैधधंद्या कारवाई केली .नुकतेच या  कारवाईचे शतक पूर्ण केले आहे. सदर अवैधधंद्याचे कारवाईमध्ये एकुण ७ कोटी ५ लाख ४५,९०६ रूपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला आहे.  कामगिरीची दखल घेवुन डॉ. वारके विशेष पोलीसमहानिरीक्षक डॉ. वारके, पोलीस अधिक्षक  संदिप पाटील यांनी पथकाचे कौतुककरुन सर्वांना  बक्षिस जाहिर केले आहे.

 गुन्हयाचा प्रकार, कारवाई संख्या, एकूण मुद्देमाल पुढीलप्रमाणे —
एनडीपीएस अ‍ॅक्ट — १ (५,८२,०००)

प्रोव्हीशन— ४५

पिटा (३५,९४,३१६)

जुगार— ४६
(८५,८५,११५),

पिटा अ‍ॅक्ट  —७ (१, ४१,२२५),

जि. व. का. कलम —१
(१४,१६,१६७)

प्राण्यांना क्रुरतेने वागवणे— १ (६,६६,०००)

गुटखा— ६
(१८,८०,९३३)

आर्म अ‍ॅक्ट  —१ (२१,१५०)

वाळू— ४ (५,३६,५९,०००)—

एकूण ११४
(७,०५,४५,९०६)

Web Title: Baramati Crime Branch clear 100 crime cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.