बारामतीत डेंग्यू, गोचीड तापाचा कहर
By Admin | Published: October 30, 2014 11:24 PM2014-10-30T23:24:39+5:302014-10-30T23:24:39+5:30
डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप यांसह अन्य विषाणूजन्य आजारांचे हजारो रुग्ण बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बारामती : डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप यांसह अन्य विषाणूजन्य आजारांचे हजारो रुग्ण बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ऐन दिवाळी सणाच्या काळात रुग्णांची संख्या वाढलेली आहे. नगरपालिका, आरोग्य प्रशासन मात्र स्वस्थ असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील सर्वच भागात या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. बारामती नगरपालिकेचे नगरसेवकदेखील झोपलेले आहेत काय, अशी विचारणा केली जात आहे.
शहरातील पोलीस निरीक्षकांपासून ते सर्वसामान्य कुटुंबातील बहुतेक घरांमधील एक तरी रुग्ण डेंग्यू, मलेरिया, गोचीड तापाने त्रस्त आहे. विशेषत: डेंग्यू आणि गोचीड तापाने शरीराला सूज येणो, सांधे दुखणो, पेशी कमी होणो, असे प्रकार आढळून येत आहेत. दोन महिन्यांपासून या प्रकारचे रुग्ण बारामतीत मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत.
रक्त, लघवी तपासणी लॅबमध्ये रक्ताच्या तपासणी करून घेण्यासाठी गर्दी होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना अॅडमिट करून घेण्यासाठी जागा कमी पडत आहेत.
बारामती शहरात सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे सर्वच रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरातील हे रुग्णालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच स्थिती आहे. एमआयडीसीत महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तेथील परिस्थितीदेखील वेगळी नाही. शहराच्या स्वच्छतेसाठी बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे कंत्रटी पद्धतीने कर्मचारी भरले आहेत. परंतु, हे कर्मचारी काम कोठे करतात, याची माहिती नगरपालिकेच्या
आरोग्य निरीक्षकांना आणि कंत्रटदारांनाच माहिती आहे. आरोग्य निरीक्षकाचे लक्ष नाही, अशी स्थिती सध्या आहे.
या संदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही नगरसेवक, तसेच आरोग्य निरीक्षकांकडे विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा फोन बंद केला जातो. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. साधारणत: डेंग्यूच्या तीन ते चार वेळा लॅब चाचण्या घेण्यासाठी एकावेळी 1 ते दीड हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सामान्य नागरिकांना न परवडणारा आहे. (प्रतिनिधी)
4नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले नगरसेवकदेखील तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेले आहेत. प्रशासनाचे त्यामुळे फावले आहे. नगरपालिकेच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे. मध्यंतरी खाटिकगल्ली परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा मोठय़ा प्रमाणात होत होता. या भागात दोन ते तीन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढलेले आहेत. ऐन दिवाळी सणासाठी नागरिकांनी खर्च करण्याऐवजी उपचारासाठी खर्च करावा लागला आहे. या स्थितीत प्रशासनाला कोणीही जाब विचारत नसल्याचे सांगण्यात आले.
4दोन महिन्यांत आतार्पयत 9 ते 1क् हजार रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. त्यामध्ये साधारणत: 4 ते साडेचार हजार रुग्णांना डेंग्यूसह अन्य विषाणूजन्य आजारांची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
4आरोग्य विभागाने दोन दिवसांपासून घरोघरी जाऊन पुन्हा सव्र्हेक्षण सुरू केले आहे. याद्वारे निश्चित आकडेवारी मिळेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु, मोठय़ा प्रमाणात डेंग्यूचा फैलाव झालेला असतानादेखील ‘नगरपालिका प्रशासन सुस्त’ असल्याचे सांगण्यात येत आहे.
4या संदर्भात तिवाटणो लॅबचे डॉ. आर. एन. तिवाटणो यांनी सांगितले, की जागृती वाढल्यामुळे रुग्ण लगेच तपासणी करून घेत आहेत. त्यामुळे डेंग्यूचे निदान लवकर होत आहे. पूर्वी अंगावर ताप काढण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कदाचित रुग्ण दगावत. आता हे प्रमाण पूर्णपणो थांबले आहे. परंतु, डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
साधारणत: दररोज रक्त तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी 2क् ते 25 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान होत आहे. ऐन दिवाळीच्या पाडव्याला या तपासणीसाठी आलेल्यांपैकी 14क् हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. विशेषत: लवकर निदान होत असल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जवळपास संपुष्टात आले आहे. परंतु, डेंग्यूमुळे सातत्याने त्रस होतो. साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होतात. हे डास दिवसा चावतात. संपूर्ण बारामती शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. परंतु, नगरपालिका प्रशासनाने, तसेच आरोग्य विभागाकडून सव्र्हेक्षण करणो, धूर फवारणी करणो या उपर दुस:या काही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच, दर मंगळवारी कोरडा दिवस पाळण्याचे फक्त आवाहन भोंग्यावर करण्यात आले. त्याची जागृती केली जात नाही.
- डॉ. पंकज गांधी
शहरात साथीचा फै लाव; डॉक्टर्स मात्र
‘अंदमान’च्या सहलीला..
शहरामध्ये विषाणूजन्य रोगांचा फैलाव असताना जवळपास 4क् ते 45 खासगी डॉक्टर ‘अंदमान’च्या सहलीला गेले आहेत. त्यामध्ये काही डॉक्टरांचा अपवाद आहे. परंतु, साथीचे आजार वाढलेले असताना मुख्य डॉक्टर सहलीला गेल्यामुळे रुग्णालयातील सहायक डॉक्टरांवर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे.