बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

By admin | Published: November 5, 2014 05:42 AM2014-11-05T05:42:46+5:302014-11-05T05:42:46+5:30

बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो.

In the Baramati district, 120 forest bunds completed | बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

बारामतीत १९० वनराई बंधारे पूर्ण

Next

बारामती : शेतक-यांमध्ये पाणी व्यवस्थापनाबाबत जागृती होण्यासाठी तसेच ओढे, नाले यामधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा वापर हंगामी पिकांसाठी करता यावा यासाठी कृषी विभागामार्फत ‘वनराई’बंधारे लोकसहभागातून बांधण्यात येत आहेत.
बारामती तालुक्यामध्ये २४० ठिकाणी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १९० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील सुपे, खामगळवाडी, लोणी भापकर आदी कृषी सज्जांमध्ये कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांनी वनराई बंधाऱ्यांची निमिर्ती केली आहे, अशी माहिती बारामती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बारामती तालुक्याचा उत्तर भाग अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये येतो. त्यामुळे या परिसरात इतर भागांच्या तुलनेने पाऊस कमी पडतो. बारामती तालुक्यातील जिरायती भागाला कायमच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. त्यामुळे या परिसरात जेवढा पाऊस पडतो. त्या पावसाचे पाणी साठवण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. पावसाच्या पाण्याचा शेवटचा थेंब सुध्दा जमिनीत मुरवावा, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होते. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी हंगामी भाजीपाल्यासारखी पिके घेऊ शकतात. या वनराई बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीत काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त
केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the Baramati district, 120 forest bunds completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.