बारामती दूध संघाच्या वतीने खरेदी दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ ; शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:15 AM2021-02-13T11:15:00+5:302021-02-13T11:15:58+5:30
सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन
बारामती: बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.या दरवाढीतुन दूध संघाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिलासा दिला आहे.
सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूधाला तसेच दूध पावडर व बटर इत्यादीची मागणी वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दूध दर वाढवून मिळत आहेत. त्यामुळे बारामती दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात रुपयांनी वाढ केली आहे. ११ फेब्रुवारी पासून बारामती दूध संघाचा ३.५/८.५ गुणप्रतसाठी गाय दूध खरेदी दर प्रति लीटर रू.29 अधिक वाहतूक / कमिशन एवढा करण्यात आला आहे. सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन होत आहे.
संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा सुविधा, आयुर्वेदिक उपचार पध्दत प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर (स्वस्त दरात) विक्री केली जाते. संघाचे पॅकींग दूध ‘नंदन’ बॅडने विविध शहरांमध्ये विकले जात असून सदरचे दूध पुणे, नाशिक, शिर्डी, मालेगांव, मुंबई, रोहा, महाड, औरंगाबाद, नांदेड, लातूर, गुलबर्गा या विविध शहरात मध्ये विक्री होत आहे. विविध नामांकित कंपन्यांना त्यामध्ये मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, अँड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पीटल, बॅच कॅन्डी हॉस्पीटल, मंत्रालय, कोकण भवन इत्यादी ठिकाणी संघाचे नंदन दूधाची विक्री होत आहे.