इंदापूर | विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 20:20 IST2022-06-11T18:06:52+5:302022-06-11T20:20:45+5:30

वीजपंप सुरु करण्यासाठी गेल्यावर विजेचा शॉक लागला...

baramati farmer dies due to electric shock pune latest news | इंदापूर | विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

इंदापूर | विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

सणसर (बारामती) : हिंगणेवाडी ( ता. इंदापूर )  येथे शेतातील वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यु झाला. तानाजी बाबुराव पवार (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

शनिवारी (दि. ११)  पवार हे त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीतील विहिरीवर वीजपंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी वीज पंपाच्या स्टार्टरमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने पंप सुरू करताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यातच पवार यांचा मृत्यू झाला.

पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यात तात्पुरत्या स्वरूपात वजन काट्यावर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: baramati farmer dies due to electric shock pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.