बारामती: बायोगॅसची टाकी साफ करताना चौघेजण गुदमरले, तिघे एकाच घरातील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 13:33 IST2023-03-15T13:32:43+5:302023-03-15T13:33:55+5:30
गोबरगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बारामती: बायोगॅसची टाकी साफ करताना चौघेजण गुदमरले, तिघे एकाच घरातील
बारामती : खांडज(ता.बारामती) येथे बायोगॅसची टाकी साफ करताना एकाच कुटुंबातील तिघाजणांसह शेजारील एकाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेनंतर उपचारासाठी सर्वांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणण्यात आले. मात्र,तत्पुर्वीच या सर्वांची प्राणज्योत मालवली.
प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहुजी गव्हाणे अशी या चौघाजणांची नावे आहेत. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. गोबरगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सिल्व्हर जुबिली रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.