Baramati: बारामती कचरा डेपोस भीषण आग, नगरपालिकेचे लाखोंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 11:42 AM2023-08-24T11:42:09+5:302023-08-24T11:43:03+5:30

या आगीचे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत...

Baramati Garbage Depot Fierce Fire, Loss of Millions to Municipality | Baramati: बारामती कचरा डेपोस भीषण आग, नगरपालिकेचे लाखोंचे नुकसान

Baramati: बारामती कचरा डेपोस भीषण आग, नगरपालिकेचे लाखोंचे नुकसान

googlenewsNext

बारामती : शहरातील अंबिकानगर लगतच्या बारामती नगरपालिकेच्या कचरा डेपोस गुरुवारी  (दि. 24) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या आगीचे धुराचे लोट सर्वत्र पसरत आहेत. या आगीमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करणारी विविध प्रकारची यंत्रणा तसेच कचरा जळून खाक झाला आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी ही यंत्रणा बसवली आहे.

या आगीमुळे जवळपास 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ठिकाणी दोन वॉचमन सातत्याने कार्यरत असतात तसेच नगरपालिकेने सीसीटीव्ही यंत्रणादेखील बसवली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. आज पहाटे दोनच्या सुमारास कचरा डेपोला आग लागल्याची माहिती समजल्यानंतर मुख्याधिकारी रोकडे, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्यासह  कर्मचाऱ्यांनी कचरा डेपोकडे धाव घेतली.

बारामती नगर परिषदेसह एमआयडीसी, छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आदी अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही आग अतिशय भीषण होती. या आगीमध्ये बारामती नगरपालिका तसेच लुको कंपनीची कचरा वर्गीकरण करणारी जवळपास सात ते आठ यंत्रे जळून भस्मसात झाली आहेत. याशिवाय वर्गीकरण केलेला जवळपास 900 टन गठ्ठे बांधून ठेवलेला कचरा देखील जळून खाक झाल्यामुळे जवळपास 40 लाख रुपयांचे कचऱ्याचे तर यंत्रणेचे जवळपास 25 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही आग काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक लावली असल्याचा दाट संशय नगरपालिकेच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे .

Web Title: Baramati Garbage Depot Fierce Fire, Loss of Millions to Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.