Pune | सोशल मीडियावर गावठी पिस्टलाचे फोटो व्हायरल करणे भोवले; तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:49 PM2022-12-26T13:49:44+5:302022-12-26T13:51:45+5:30

दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक...

baramati Gavathi Pistol's photos went viral on social media; Youth arrested | Pune | सोशल मीडियावर गावठी पिस्टलाचे फोटो व्हायरल करणे भोवले; तरुणाला अटक 

Pune | सोशल मीडियावर गावठी पिस्टलाचे फोटो व्हायरल करणे भोवले; तरुणाला अटक 

googlenewsNext

सांगवी (बारामती) : सोशल मीडियावर दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसाचे फोटो व्हायरल करणे एका तरुणाला चांगलेच भोवले. माळेगाव पोलिसांना त्याचा सुगावा लागून दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह त्याला अटक केली आहे. आकाश सुरेश हजारे (वय २४) मुळ रा. शिंदेवाडी ( ता. माळशिरस जि. सोलापूर), सध्या रा. लकडेनगर, माळेगाव (ता. बारामती जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत विजय सोपान वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल यांनी फिर्याद दिली असून भारतीय शस्त्र अधिनियम व  महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. २४) रोजी साडे अकरा वाजण्याच्या  सुमारास आरोपी आकाश हजारे हा माळेगाव येथील पीर बाबाच्या दर्ग्याजवळ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक देवीदास साळवे व पोलिसांनी सापळा रचला होता. त्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

दोन अग्निशस्त्र गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस विक्रीसाठी माळेगाव (ता. बारामती) येथे आला होता. दरम्यान गावठी पिस्टल विकत घेण्यासाठी येणाऱ्या पार्टीला पोलिसांची चाहूल लागल्याने ते लांबूनच फरार झाले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश हजारे याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली होती. हजारे हा बेकायदेशीर गावठी पिस्टल व काडतुसे विकत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

याबाबत आरोपी आकाश हजारे याची विचारपुस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडविची उत्तरे दिली. त्यानंतर दोन पंचासमक्ष ५० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस पोलीस उपनिरीक्षक, डी.आर. साळवे यांनी पंचनाम्याने जागीच जप्त केली. 

Web Title: baramati Gavathi Pistol's photos went viral on social media; Youth arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.