बारामतीला झोडपले

By admin | Published: May 10, 2015 05:00 AM2015-05-10T05:00:36+5:302015-05-10T05:00:36+5:30

बारामती शहरात शनिवारी (दि. ९) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील गणेश मंडईत या अचानक

Baramati got scared | बारामतीला झोडपले

बारामतीला झोडपले

Next

बारामती : बारामती शहरात शनिवारी (दि. ९) विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील गणेश मंडईत या अचानक आलेल्या आजच्या पावसाने फळ, भाजी विक्रेत्यांबरोबरच शेतकऱ्यांनादेखील त्रास झाला. त्याचबरोबर ग्राहकांची त्रेधा उडाली. फळांचे आणि भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्यात मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
संध्याकाळी सहा वाजता अचानक पाऊस सुरू झाला. शहरात होत असलेल्या गणेश मंडईच्या बांधकामामुळे फळभाजी विक्रेत्यांसाठी रिंगरोडलगत तात्पुरती सोय करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी झालेल्या पावसाने भाजीपाला भिजला. तसेच, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तात्पुरत्या स्वरूपात बांधलेल्या कट्ट्यांभोवती पाण्याचे डोह साठले. त्यातून मार्ग काढताना ग्राहकांचीदेखील त्रेधा उडाली. मंडईच्या कामामुळे स्थलांतरित केलेल्या ठिकाणी पावसाने दलदल होऊ नये, यासाठी फरशी अथवा सिमेंट काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी ठेकेदाराकडे करण्यात आली आहे. परंतु, ठेकेदाराने भाजीविक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंत फळभाजी विक्रेते चिऊशेठ जंजिरे यांनी व्यक्त केली.
वालचंदनगर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस
रात्री ८ वाजल्यानंतर वालचंदनगरसह अन्य परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वालचंदनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रत्नपुरी, शिरसटवाडी, जंक्शन परिसरात विजेचा लंपडाव सुरू होता. त्यानंतर तुरळक पावसाच्या सरी पडल्या. उशिरापर्यंत पावसाच्या सरी तुरळक प्रमाणात कोसळत होत्या. इंदापूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)

Web Title: Baramati got scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.