बारामतीत १५० बेड क्षमतेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:17+5:302021-04-17T04:10:17+5:30
सुप्यातदेखील कोविड रुग्णालय होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश बारामती : बारामती येथील शासनाच्या सर्वोपचार रुग्णालयात १५० ...
सुप्यातदेखील कोविड रुग्णालय होणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
बारामती : बारामती येथील शासनाच्या सर्वोपचार रुग्णालयात १५० बेडच्या क्षमतेचा ऑक्सिजन सुविधा असलेला विभाग येत्या आठवडाभरात सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या (दि. १६) बैठकीत विविध सूचना पवार यांनी दिल्या.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी याबाबत आज माहिती दिली. गुजर यांनी सांगितले कि, पवार यांनी पुढच्या १५० खाटांचा विभाग पुढच्या दहा दिवसांत कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. सुपे ग्रामीण रुग्णालय येथेही २५ खाटांचे रुग्णालय तयार करण्याच्या सूचना पवार यांनी आरोग्य विभागास दिल्या.
सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय, शासकीय महिला रुग्णालयात आगप्रतिबंधक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या.बारामतीतील रुग्णांना रेमडेसिविर, मनुष्यबळ, ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या आहेत.
खाजगी दवाखान्यांकडून रुग्णाला दिल्या जाणाऱ्या बिलांचीही तपासणी करा. बिलांबाबत शासननिर्देश व दिली जाणारी बिले यांची पडताळणी काटेकोरपणे करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्याचे गुजर यांनी सांगितले.
...त्या डॉक्टरांवर होणार कारवाई
वैद्यकीय महाविद्यालय व शासनाच्या आरोग्य विभागाशी संबंधित काही डॉक्टर्स बारामतीत सेवा बजावत नाहीत. दररोज पुण्याहून ये जा करतात ही बाबही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यावर पवार यांनी याबाबत कारवाईच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत,असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी सांगितले.