बारामतीत हेल्मेटसक्तीचा फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:44 AM2019-01-25T01:44:40+5:302019-01-25T01:44:45+5:30

बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि. २४ ) पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला.

Baramati helmet fascia | बारामतीत हेल्मेटसक्तीचा फज्जा

बारामतीत हेल्मेटसक्तीचा फज्जा

Next

बारामती : बारामती विभागात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गुरुवार (दि. २४ ) पासून जाहीर केलेल्या हेल्मेटसक्तीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांसह सीटबेल्ट न लावता चारचाकी वाहन चालविणाºया वाहनचालकांविरुद्ध आजपासून कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, कार्यालयावर फ्लार्इंग स्कॉड इतरत्र गेल्याने आज करण्यात येणारी कारवाई रद्द करण्याची नामुष्कीची वेळ ओढवली. आता सोमवार (दि. २८ ) पासून ही कारवाई करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बारामती विभागांतर्गत येणाºया बारामती, दौंड, इंदापूर शहर तालुक्यात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. याबाबत खुद्द उपपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार या कारवाईमध्ये दोषी वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना जप्त करण्याचा इशारा दिला होता. शिवाय, दोषी वाहनचालकांना बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दोन तासांच्या समुपदेशनासाठी हजर राहावे लागणार असल्याचेदेखील सांगण्यात आले होते.
अन्यथा, वाहनचालकांविरोधात चालविण्यात येणारा खटला निकालात न काढण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आला आहे.
शिवाय, हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणाºया व्यक्तीसह मागे बसलेल्या व्यक्तीसाठी देखील लागू राहणार आहे. त्यामुळे आज बारामती उपविभागात विशेषत दुचाकीस्वारांनी हेल्मेटसक्तीचा सर्वानी धसका घेतला होता. गुरुवारी (दि. २४) आठवडे बाजार असल्याने कारवाईच्या भीतीने अनेक जणांनी शहरात दबकतच प्रवेश केला.
मात्र, कारवाईचा कोठेही मागमूस न आढळल्याने हेल्मेटसक्ती कारवाई करण्यासाठी प्रशासन नरमल्याची चर्चा सुरू झाली. सकाळी १० नंतर तर कोठेही कारवाई न दिसल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक सुरु झाली.
यामध्ये बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न करता, कारमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ‘फ्लार्इंग स्कॉड’ ला पुणे येथे बोलविण्यात आले आहे.पुणे शहरातील अवैध बस वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी बारामतीसह, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकलूज येथील स्कॉडला देखील
बोलविण्यात
आले
आहे.पुढील
चार दिवस
पुणे शहरात
ती कारवाई
सुरु
राहणार आहे.
>...लाखो वाहनचालकांसाठी केवळ
दोन वाहन निरीक्षकांचे ‘फ्लार्इंग स्कॉड’
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड तालुक्याचा समावेश आहे. हेल्मेट वापरासह कारमध्ये सीटबेल्ट वापर न करणाºया वाहनचालकांवर या कार्यालयाच्या ‘फ्लार्इंग स्कॉड’मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, या स्कॉडमध्ये अवघ्या दोन वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. या निरीक्षकांसह, कार्यालयासाठीदेखील केवळ एकच वाहन आहे. त्यामुळे तीन तालुक्यांतील लाखोंच्या संख्येत असणाºया वाहनचालकांसाठी केवळ दोन वाहन निरीक्षक कारवाई कशी करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे कारवाई सुरू झाली तरी, अधिकारी, कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे कारवाईचा पुन्हा फज्जाच उडण्याची चिन्हे आहेत.
>बारामती विभागात हेल्मेट सक्तीचा मनुष्यबळाअभावी पूर्णपणे फज्जा उडाल्याचे
दिसून बारामतीत गुरुवारी कारवाई होऊ शकली नाही. सोमवारी (दि. २८) पासून ही कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचीदेखील मदत घेण्यात येईल.

Web Title: Baramati helmet fascia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.