बारामती, इंदापूरचे दूध उत्पादक अडचणीत
By admin | Published: November 22, 2014 12:39 AM2014-11-22T00:39:30+5:302014-11-22T00:39:30+5:30
एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊस दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.
शेटफळगढे : एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊस दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना आधारभूत किमतीपेक्षा कमी दर देणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी दूध उत्पादकांकडून केली जात आहे.
एका महिन्यात २४ रुपयांवरून १९ रुपयांवर प्रतिलिटर दूध
खरेदी दर केला. शासनाचा दूध दर मात्र २० रुपये असताना खासगी दूध व्यावसायिक दूध उत्पादकांना १९ रुपयाने दर देण्याचा घाट
घालत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ही कमी दर देत आहेत. तरी देखील शासन स्तरावरून कोणतीच हालचाल होत नाही. परिणामी दूध धंदा करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना पावडरीचे दर कोसळले आहेत. त्यामुळे २४ रुपयांचा खरेदी दर १९ रुपयांवर आणला आहे, असे उत्पादकांना सांगितले. मात्र, बाजारातील दूध ग्राहकांना मात्र पूर्वीच्याच दराने दूध विकले जात आहे, असे धोरण राबवून दूध उत्पादकांची लूट होत असल्याची भावना दूध उत्पादकांची होत आहे.
दूध व्यवसायातील जाणकार लोकांच्या मते दुधाची केवळ पावडरच बनत नाही, तर इतर उत्पादने केली जातात. त्या इतर उत्पादनाचे भाव मात्र ‘जैसे थे’ आहेत.
पावडर की इतर उत्पादने तयार करून राहिलेल्या दुधापासून बनविली जाते. त्यामुळे पावडरच्या बाजारावर शेतकऱ्यांचा दर कमी करणे चुकीचे आहे, असे सांगत आहेत.
बाजारात पावडरीचे दर १५० च्या दरम्यान आहेत. मात्र, ते दर २८० रुपयांवर असताना शेतकऱ्यांना अधिकचा दर दिला नाही, असा सवाल देखील दूध उत्पादकांमधून होत आहे. (वार्ताहर)