बारामती- इंदापूररस्ता डांबरीझाला, मात्र साईड पट्टी कधी भरणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:37+5:302021-03-16T04:12:37+5:30
मागील सहा महिन्यापूर्वी रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले होते अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी याविषयी आवाज उठवला होता. अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी ...
मागील सहा महिन्यापूर्वी रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले होते अनेक प्रसिद्धीमाध्यमांनी याविषयी आवाज उठवला होता. अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्यावर वृक्षारोपनही केले होते. यामुळे या रस्त्याच्या कामास सार्वजनिक बांधकाम विभागास मुहूर्त मिळाला आणि रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.मात्र बारामती इंदापूर या रस्त्यावरील साईड पट्ट्या ठेकेदाराने अद्यापही भरल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने रस्त्यावरची रहदारीही वाढली आहे. डांबरीकरणामुळे रस्त्यावरील साईट पट्ट्या चार इंचापासुन ते अगदी काही ठिकाणी एक फुटापर्यंत उंच आहेत. त्यामुळे मोटारसायकल चालकांना रस्त्यावरून वाहन खाली उतरवणे किंवा वरती चढवणे जिकिरीचे झाले आहे.
रस्त्याचे काम होऊन एक महिन्यापेक्षा ज्यादा अवधी झाला मात्र साईड पट्ट्यांवर मुरूम टाकने गरजेचे होते. साईट पट्ट्यांवर मुरूम न टाकल्याने मोटारसायकल घसरून आजच्या अपघातात दोन निष्पाप नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठेकेदाराने जर या रस्त्यावर आठ दिवसात मुरूम टाकला नाही तर ग्रामस्थांच्या मदतीने आंदोलन उभारण्यात येईल.
रोहित पाटील, सामाजिक कार्यकर्ते सणसर विकास मंच