बारामतीतून कोकण, अष्टविनायक दर्शन बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:45+5:302020-12-22T04:10:45+5:30
एसटी महामंडळाकडून बसकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी बससेवा सुरू केली जात आहे. पुण्यातून नुकतीच महाबळेश्वर, रायगड ...
एसटी महामंडळाकडून बसकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी बससेवा सुरू केली जात आहे. पुण्यातून नुकतीच महाबळेश्वर, रायगड व अष्टविनायक सेवा सुरू करण्यात आली. आता बारामती येथून कोकण दर्शन बस दि. २६ डिसेंबर रोजी धावेल. ही गाडी बारामती येथून सकाळी ७ वाजता निघेल. कोयना नगर डॅम गार्डन, डेरवण, संगमेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, थिबा पॅलेस, सुरूबन, भगवती किल्ला, मार्लेश्वर आदी पर्यटनस्थळे पाहून रात्री ११ वाजता बारामती येथे पोहचेल. प्रति प्रवासी १०२० रुपये भाडे निश्चित केले आहे. अष्टविनायक दर्शन ही बस दि. २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता सुटणार आहे.
दि. २८ डिसेंबर पासून गाणगापुर दर्शन या बसचे नियोजन केले आहे. ही गाडी बारामती येथून सकाळी ९ वाजता निघेल. अक्कलकोट पाहून गाणगापुर येथे मुक्काम असेल. दि. २९ डिसेंबर रोजी दत्त जयंतीमुळे दुपारी १ वाजात सुटून बारामतीला रात्री ११ वाजता पोहचेल. या गाड्यांचे आगाऊ आरक्षण महामंडळ किंवा इतर संबंधित संकेतस्थळावरून तसेच कोणत्याही आगारातून करता येईल.
---------------