बारामती कोविड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:44+5:302021-04-29T04:08:44+5:30

उपमुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्घाटन बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांना बेड ...

Baramati Kovid | बारामती कोविड

बारामती कोविड

googlenewsNext

उपमुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्घाटन

बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नसल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर धों. आ. सातव कारभारी हायस्कूल कसबा येथे पाच दिवसांत १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्याचे ‘लोकार्पण’ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने बुधवारी (दि. २८) करण्यात आले आहे.

बारामतीकरांना सेवा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील सातव कुटुंबीयांच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड व डॉ. सुनील पवार यांच्या अंतर्गत १०० बेड क्षमतेचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. कसबा येथील धों. आ. सातव हायस्कूलमध्ये सर्व शासकीय परवानगी घेऊन कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. मागील काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढत असून, अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याने नातेवाइकांची धावपळ होत असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. सुनील पवार यांच्या येथील सातव कुटुंबातील माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, नगरसेवक सूरज सातव, डॉ. सुहासिनी सातव, दि. माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी पुढाकार घेत कोविड हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलमध्ये ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, तर व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेनुसार व्हेंटिलेटर लावले आहेत. तर औषध व विविध तपासण्यांचा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागणार आहे. इतर सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये १५ डॉक्टर व नर्सिंग स्टाफ २४ तास असेल. हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी व औषधांची सुविधा दिली आहे. तर २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा, डॉक्टर, सिव्हिल सर्जन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे सहकार्य लाभले.

या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, गटनेते पंचायत समिती प्रदीप धापटे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक नारायण शिरगावकर, डॉ. अशोक तांबे, वसंत गावडे चेअरमन मार्केट कमिटी, अध्यक्ष खरेदी-विक्री संघ शिवाजी टेंगले, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, अनिल तावरे, सुरेश खलाटे, स्वप्निल जगताप संचालक माळेगाव सहकारी साखर कारखाना उपस्थित होते.

—————————————————

...घरातही आता प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे

मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलिसांना आता दोन मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. घरातही आता प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे, तरच कोरोनाचा धोका आपण टाळू शकतो. बाहेर फिरताना डबल मास्क वापरा, असा काही तज्ज्ञांनी याबाबत सल्ला दिलेला आहे. आगीपासून बचाव करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना हाती घ्या,

-अजित पवार, उपमुख्यमंत्री

————————————————

फोटोओळी— बारामती- येथील धो. आ. सातव कोविड हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती नीता फरांदे व माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव आणि अन्य.

२८०४२०२१ बारामती—११

——————————————

Web Title: Baramati Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.