Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:38 AM2024-06-04T08:38:49+5:302024-06-04T08:40:06+5:30
बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत (Baramati Lok Sabha Election 2024, Baramati Lok Sabha Election 2024 Live, Baramati Lok Sabha Election 2024 Live Updates, Baramati Lok Sabha Election 2024 Result)
Baramati Lok Sabha Result 2024| पुणे :बारामती लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत. पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली होती. पण पुढील मतमोजणीत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे. पुरंदरमधून सुनेत्रा पवारांनी दहा हजार मतांनी आघाडी घेतली होती. आता पुढील मोजणी सुळे सुप्रिया सुळे या ६हजार ९०० मतांनी पुढे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नणंद-भाऊजय निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही बाजून जोरदार प्रचार झाला होता. सध्या सुरुवातीच्या कलामध्ये तर सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि सुप्रिया सुळे पिछाडीवर आहेत.
बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत. लोकसभेपासून सुरू झालेला हा राजकीय तणाव बारामतीकर इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत अनुभवणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नव्याने जुळलेली राजकीय समीकरणे निभावताना सर्वच पक्षांच्या प्रमुखांचा आता कस लागणार आहे. बारामतीकरांनी नव्याने निर्माण झालेली राजकीय गणितांमध्ये केलेली बेरीज-वजाबाकीदेखील आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच निकालाची घाई -
बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष करण्याची तयारी केली आहे. गुलाल आमचाच, असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्यामुळे इंदापूर शहरात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालाची घाई झाल्याचे यावरून दिसून येते.