बारामती एमआयडीसी जलवाहिनी पूर्ण

By admin | Published: June 19, 2016 04:33 AM2016-06-19T04:33:44+5:302016-06-19T04:33:44+5:30

बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला येथील उद्योगांचा, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला

Baramati MIDC Water Supply Complex | बारामती एमआयडीसी जलवाहिनी पूर्ण

बारामती एमआयडीसी जलवाहिनी पूर्ण

Next

बारामती : बारामती एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला येथील उद्योगांचा, नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याशिवाय नवीन जलवाहिनीमुळे पाणीचोरी थांबली आहे. ‘लोकमत’नेयाबाबत केलेल्य्
ाा पाठपुराव्याला यश आले आहे.
येथील एमआयडीसीतील उद्योगांना, नागरिकांना उजनी जलाशयाच्या पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, जीर्ण झालेल्या जलवाहिनीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत असे. जलवाहिनी फोडून पाणीचोरीचे प्रकार वाढीस लागले होते. उद्योगांच्या मागणीच्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ उद्योजकांवर आली होती. ऐन उन्हाळ्यात उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी कमालीची घटली होती. तसेच ६ दिवस येथील पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे उद्योजक, नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ‘लोेकमत’ने या प्रश्नाबाबत सतत वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेण्यात आली. सुमारे १६ कोटी रुपये निधी खर्च करून जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ४ कोटींचा निधी उजनी जलाशयातील जॅकवेलसाठी मंजूर करण्यात आला आहे. सध्या या जॅकवेलचे काम प्रगतिपथावर आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे सध्या प्रतिदिन ८ ते १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे उद्योगांना मागणीप्रमाणे पाणी मिळत आहे.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: Baramati MIDC Water Supply Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.