बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 07:04 PM2023-09-16T19:04:18+5:302023-09-16T19:04:53+5:30

पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता....

Baramati molestation with minor girl, one sentenced to rigorous imprisonment | बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास

बारामती: अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे, एकास सश्रम कारावास

googlenewsNext

बारामती (पुणे) : अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याच्या खटल्यात राजू साहेबराव गायकवाड (वय ५५, रा. सुहासनगर, बारामती) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश ए. ए. शहापुरे यांनी सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

बारामती शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी शहरातील स्टेडियममध्ये हा प्रकार घडला होता. पीडित अल्पवयीन मुलगी दोघा भावांसह येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेली होती. यावेळी गायकवाड याने तिला जवळ बोलावून तिच्याशी लैंगिक चाळे केले होते. घाबरलेल्या मुलीने तेथून पळत घरी जात आजीला हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर या कुटुंबाने गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे यांनी या खटल्याचा तपास करत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. संदीप ओहोळ यांनी काम पाहिले. त्यांनी सादर केलेले साक्षी, पुरावे, जबाब व युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश शहापुरे यांनी गायकवाड याला पोक्सो अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास तसेच विनयभंग प्रकरणी ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, अंमलदार नवनाथ नलवडे यांचे सहकार्य झाले.

Web Title: Baramati molestation with minor girl, one sentenced to rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.