बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:54 AM2018-12-28T00:54:37+5:302018-12-28T00:54:55+5:30

बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला

Baramati Municipal Council compiled two year's audit report, the finance minister complained | बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार

बारामती नगर परिषदेचे दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल दडवले , अर्थमंत्र्यांकडे तक्रार

Next

बारामती : बारामती नगर परिषदेचे गेल्या दोन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतरसुद्धा ते दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, असा गंभीर प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.

मागील दोन आर्थिक वर्षातील अहवाल सभागृहापुढे मांडले नसताना आता २०१७— १८चे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित विभागाचे पथक बारामती नगर परिषदेत दाखल झाले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांचा अहवाल सभागृहापुढे मांडलाच नव्हता. पालिकेचे सन २०१५-१६ व २०१६-१७ चे लेखापरीक्षण् एकत्रीतपणे मार्च २०१८मध्ये झाले. ते झाल्यानंतरही सभागृहापुढे सादर करणे बंधनकारक असताना, तो का दाखल केला नाही, याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही.

नियमानुसार पुढील ४० दिवसांत तो सभागृहापुढे ठेवणे अपेक्षित असते. सभागृहात चर्चा होऊन त्यातील त्रुटी किंवा आर्थिक वसुलीबाबत चर्चा होणे अपेक्षित असते. या परीस्थितीत मागील दोन आर्थिक वर्षाचा अहवाल सादर न होता सन २०१७—१८ चे लेखापरीक्षण करण्यासाठी संबंधित विभागाचे पथक पालिके त दाखल झाले आहे. मागील दोन्ही अहवाल पालिकेला देण्यात आले आहेत. ते सभागृहापुढे ठेवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष, मुख्याधिकाºयांची असल्याची माहितीदेखील लेखापरीक्षण विभागाच्या संचालकांनी दिल्याचे सस्ते यांनी सांगितले. त्यामुळे जाणीवपूर्वक हे अहवाल दडवल्याचा आरोप सस्ते यांनी केला आहे. मागील २ वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सर्वसाधारण सभेच्या मान्य ठरावाच्या प्रतीसह स्थानिक निधी लेखापरीक्षणाचे सहायक संचालकांना प्राप्त झालेला नाही. तरी देखील त्याच्या पुढील तिसºया वर्षाचे २०१७—१८ या कालावधीचे लेखापरीक्षण करण्यास शासनाचा लेखापरीक्षण विभाग येऊच कसा शकतो, असा सवालदेखील सस्ते यांनी केला आहे.

...हे न उलगडणारे
कोडेच
लेखापरीक्षणाबाबत माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर २३ आॅगस्ट २०१८ आणि १ सप्टेंबर २०१८ रोजी पोस्टामार्फत पाठविलेले लेखापरीक्षण अहवाल
लगोलग २७ डिसेंबर २०१८
रोजीच प्राप्त झाले. याबाबत नगराध्यक्षा प्रेसनोटद्वारे
कळवितात, हे न उलगडणारे कोडे असल्याचा टोला विरोधी नगरसेवक सुनील सस्ते यांनी लगावला आहे.

Web Title: Baramati Municipal Council compiled two year's audit report, the finance minister complained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.