बारामती नगरपरिषद बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:00+5:302021-07-29T04:11:00+5:30

लावणार ८००० झाडे बारामती :माझी वसुंधरा अभियान टप्पा-२ अंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी पार्कचा शुभारंभ करण्यात आला. ५ ...

Baramati Municipal Council will set up a Biodiversity Park | बारामती नगरपरिषद बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार

बारामती नगरपरिषद बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार

Next

लावणार ८००० झाडे

बारामती :माझी वसुंधरा अभियान टप्पा-२ अंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी पार्कचा शुभारंभ करण्यात आला. ५ जून २०२१ पासून सुरू झालेल्या माझी वसुंधरा अभियान-२ अंतर्गत बारामती नगरपरिषदेने काम सुरू केले आहे.या अंतर्गत पावसाळ्याअखेर शहरात ८००० झाडे लावण्यात येणार आहेत.

एन्व्हार्यमेन्टल फोरम आॅफ इंडिया यांच्या संकल्पनेतून बारामती शहर व तालुक्यात मिशन एक लाख वृक्षलागवड या उपक्रमाअंतर्गत वृक्ष लागवड या पावसाळ्यात करण्यात येणार आहेत. अभियानाचा फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भिगवण रस्ता येथे वृक्षलागवड करून शुभारंभ करण्यात आला. शहर परिसरात ८०० च्या आसपास वृक्षलागवड झाली आहे. ८००० वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टापैकी उर्वरित वृक्ष लागवडीचे नियोजन नगरपरिषदेच्या उद्यान विभागामार्फत केले आहे.

परिसरात देशी, आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेल्या १४७ वनस्पतींची लागवड करून बायोडायव्हर्सिटी उभारण्यात आला आहे. यामध्ये गवतीचहा, बेडकीपाला, पानफुटी, ओवा, तुळस, कापुरतुळस, गुंजवेल, कांडवेल, अक्कलकाढा वनस्पती, पेपर मिंट इ. वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. यावेळी नगराअध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराअध्यक्ष अभिजीत जाधव,गटनेते सचिन सातव, नगरपरीषद सदस्य डॉ. सुहासिनी सातव, जयसिंग देशमुख, गणेश सोनवणे, शारदा मोकाशी,सामाजिक कार्यकर्ते रणजीत तावरे, डॉ. सुनीता शाह, डॉ.विशाल मेहता उपस्थित होते.

फोटोओळी—माझी वसुंधरा अभियान टप्पा-२ अंतर्गत बारामती नगरपरिषदेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी पार्कचा शुभारंभ करण्यात आला.

२८०७२०२१ बारामती—१४

Web Title: Baramati Municipal Council will set up a Biodiversity Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.