विहिरीचे काम सुरू असताना रिंग पडून चार मजूर गाडल्याची भीती; इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:00 AM2023-08-02T08:00:02+5:302023-08-02T08:01:12+5:30
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंग आणि मुरुम ढासळून त्याखाली चार मजूर अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .
बारामती- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना रिंग आणि मुरुम ढासळून त्याखाली चार मजूर अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ,मंगळवारी (दि १)रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. विजय अंबादास क्षीरसागर(रा. सणसर, ता. इंदापूर, जिल्हा. पुणे यांचे मौजे म्हसोबावाडी) गावचे हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८मध्ये विहिरीचे रिंग बांधकाम सुरू होते.
यावेळी विहिरीमध्ये रिंग पडून व मुरूम ढासळून सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.३५ वर्ष),जावेद अकबर मुलानी(वय. ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय ३० वर्ष) मनोज मारुती सावंत( वय ४० वर्षे, सर्व रा. बेलवाडी, ता.इंदापूर, जि. पुणे )हे गाढले गेले आहेत. सदरची विहीर ही १२० फुट व्यासाची (गोल) व १२७ फुट खोल आहे.
गोळीबार करणारा आरपीएफ जवान तपासात सहकार्य करत नाही, चौकशीदरम्यान करतोय नारेबाजी
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे ,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसिलदार श्रीकांत पाटील हजर आहेत. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोकलेन मशीन लावून विहिरीचे डासाळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.