Baramati News: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:24 PM2023-08-08T13:24:45+5:302023-08-08T13:25:29+5:30

आरोपीच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता...

Baramati News One gets 20 years rigorous imprisonment in case of child sexual abuse | Baramati News: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास

Baramati News: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी एकास २० वर्षे सश्रम कारावास

googlenewsNext

बारामती: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी प्रकाश किसन अडागळे (रा.पारगाव सालमालू, गाडाळवाडी, ता.दौड) यास बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.ए. शेख यांनी बाललैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची हकीकत अशी की, २३ मार्च २०२१ रोजी रोजी दुपारी तीनच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी पारगाव सालुमालू गाडाळवाडी येथील किराणा मालाच्या दुकानात मेंदीची पुडी आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी प्रकाश अडागळे याने पीडित मुलीला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी तक्रार पीडितेच्या आईने यवत पोलिस स्टेशनमध्ये केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस.ए.नागरगोजे यांनी करत आरोपीच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

आरोपी हा न्यायालयीन बंदी होता. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी व पीडितेची आई यांनी न्यायालयात साक्ष दिली. पीडित मुलगी ही ६ वर्षांची अल्पवयीन असूनही तिने झालेली घटना न्यायालयात सविस्तर सांगितली. तसेच, खटल्यामध्ये मुलीच्या वयाबाबतचा पुरावा नसल्याने डॉक्टरांची साक्ष घेण्यात आली. ही साक्ष खटल्याकामी महत्त्वपूर्ण ठरली.

या प्रकरणात ती साक्ष व न्याय वैद्यकीय पुरावा व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या, विशेष सरकारी वकील वसेकर यांनी या खटल्याच्या कामकाजात केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी प्रकाश अडागळे यास बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ प्रमाणे २० वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, भादंवि कलम ५०६ प्रमाणे तीन महिने व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पीडितेस मनोधैर्य योजनेंतर्गत तीस दिवसांमध्ये नुकसान भरपाई देण्याचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना आदेश केला आहे. या खटल्यात सरकार पक्षाला यवतचे पोलिस उपनिरीक्षक एस.ए. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट अंमलदार संतोष ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी नामदेव नलवडे व सरकारी वकील कार्यालयाच्या लिपिक वर्षा सुतार यांनी सहकार्य केले.

Web Title: Baramati News One gets 20 years rigorous imprisonment in case of child sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.