सात-बारा डिजिटलायझेशनमध्ये जिल्ह्यात बारामती नंबर वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:11 AM2021-03-27T04:11:34+5:302021-03-27T04:11:34+5:30
(रविकिरण सासवडे) उताऱ्यावर ११ महत्त्वपूर्ण बदल (रविकिरण सासवडे) बारामती :राज्य सरकारने ब्रिटिश काळानंतर २०२० मध्ये राज्यात नवी महसूल रचना ...
(रविकिरण सासवडे)
उताऱ्यावर ११ महत्त्वपूर्ण बदल
(रविकिरण सासवडे)
बारामती :राज्य सरकारने ब्रिटिश काळानंतर २०२० मध्ये राज्यात नवी महसूल रचना अमलात आणली. त्यानंतर नवीन डिजिटल सात-बारा देण्यास सप्टेंबर २०२० मध्ये मंजुरी दिली. पुणे जिल्ह्यात बारामती तालुका सातबारा डिजीटलायझेशनच्या बाबतीत नंबर एकवर आहे. बारामती तालुक्यात ८२ हजार सातबारा उताºयांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून लवकरच त्याचे वाटप सुरू होणार आहे. या नवीन उताऱ्यावर ११ महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
ब्रिटिशकाळात १९४१ मध्ये महसूल रचनेत काही प्रमाणात बदल करण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये नवीन महसूल रचना अमलात आणत त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यासह बारामतीत नवीन सातबारा देण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान ३ मार्च २०२० ला महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली आहे. त्याव्यतिरिक्त नवीन सातबारा उताºयावर गावाच्या नावासह कोड क्रमांकही येणार आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्राबाबत हेक्टर, आर तर अकृषिक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांकाची युनिट क्रमांकांसह नोंद घेतली जाणार असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.
नवीन सातबारामुळे जमीन कोणत्या प्रकाराची आहे, हे सहज समजणार आहे. जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन महसूलचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे.
-विजय पाटील
तहसीलदार बारामती
--------------
गाव नमुना सातमधील ११ महत्त्वपूर्ण...
- गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक येणार
- लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र स्वतंत्र दर्शवून एकूण क्षेत्र नमूद होणार
- शेती क्षेत्रासाठी हेक्टर आर व चौरस मीटर तर अकृषिक (एनए) क्षेत्रासाठी चौरस मीटर हे एकक
- खाते क्रमांक इतर हक्क या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोर असणार
- मृत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंसात दाखवत. आता ही माहिती कंसातच परंतु त्यावर एक आडवी रेष मारून असेल
- प्रलंबित फेरफारांची नोंद इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे प्रलंबित फेरफार म्हणून राहील
- नवीन उताºयात सर्वात शेवटी जुने फेरफार क्रमांक असा रकाना असेल, त्यात जुने फेरफार एकत्रित दर्शवले जातील.
- खातेदार स्पष्टपणे लक्षात यावेत यासाठी दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष राहील.
- गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सर्वात शेवटी शेवटचा फेरफार क्रमांक आणि दिनांक या पयार्यासमोर नमुद असेल.
- अकृषिक (एनए) सातबारा उताºयावरील जमिनीचे एकक आर चौरस मीटर राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने नसतील
- एनए उताºयात शेवटी हे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर १२ ची आवश्यकता नाही, अशी स्पष्ट सूचना राहील