बारामतीच्या वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या कारचा अपघात, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 10:06 AM2024-12-09T10:06:09+5:302024-12-09T10:06:27+5:30
अपघातग्रस्तांमध्ये लहान गंभीर मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
बारामती: बारामती तालुक्यातील जैनक वाडी, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेतील वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला. चार विद्यार्थी बारामतीहून भिगवन च्या दिशेने टाटा कारमधून निघाले होते. यावेळी वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
यामध्ये दक्षू शर्मा (वय 21,वर्षे रा. दिल्ली) आदित्य कणसे (रा. मुंबई) या दोघांचा मृत्यू झाला आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे जैनक वाडी गावामध्ये, लामजेवाडी गावाजवळ बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवनच्या दिशेने चालले होते. टाटा गाडीतून जात असताना वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यामध्ये दक्षू शर्मा आणि आदित्य कणसे या दोघांचा मृत्यू झाला. तर मुलगी चेष्टा बिश्नोई आणि कृष्णासून सिंग या दोघांवर भिगवण ICU या ठिकाणी उपचार चालू असून मुलीची परिस्थिती गंभीर आहे. याठिकाणी अपघात झाल्याचे समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टॉप, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ, खाजगी ॲम्बुलन्स चालक केतन वाहक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी भिगवन ICU येथे दाखल करण्यात आले आहे.