बारामतीत रंगणार दोन दिवस महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:57 AM2018-01-30T11:57:53+5:302018-01-30T12:00:33+5:30
महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
पुणे : महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचे आयोजन बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
प्रादेशिकस्तरावर आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात विजेतेपद पटकावलेल्या नाटकांची आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. बुधवारी सकाळी १०.३० वाजता लातूर परिमंडलाचे नाटक सादर होइॅल. दुपारी ३.३० वाजता भांडुप परिमंडलातर्फे ‘नजरकैद’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी १० वाजता पुणे परिमंडलाच्या वतीने ‘मेकअप’ या नाटकाचे सादरीकरण होईल. दुपारी ३ वाजता नागपूर परिमंडलाच्या वतीने ‘ते दोन दिवस’ हे नाटक सादर करण्यात येईल.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अभिजित देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
या वेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे उपस्थित राहणार आहेत.